पोस्ट्स

प्रस्थापितांच्या शोकाला जेव्हा सत्तेचे डोहाळे लागतात

इमेज
✍️थे ऋषिकेश सुरेश आहेरच्या लेखणीतून अजित दादांच्या निधनाला दोन-तीन दिवसही उलटले नाहीत, तोच पवार कुटुंब आणि राजकीय वर्तुळात सत्तेचे पडघम वाजले, याचे नवल वाटते. शरद पवारांनी नेहमीप्रमाणे आपले दौरे सुरू केले आहेत. सामान्य माणूस आणि या राजकीय वर्गातील हा फरक आज प्रकर्षाने जाणवला. एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्ती जग सोडून गेली, तर त्याचे नातेवाईक किमान १०-१२ दिवस तरी दुखवटा पाळतात, अनेक गोष्टी वर्ज करतात. पण दुसरीकडे समाजात असाही एक वर्ग आहे, जो मागील क्षणी घडलेली दुःखद घटना विसरून पुढच्या क्षणी सत्तेच्या गणितात मग्न होतो. यात चूक-बरोबर ठरवण्यापेक्षा, 'माणुसकी' आणि 'प्राणी' यांच्यातील पुसट होत चाललेली ही रेषाच अधोरेखित होते. ज्या दिवशी समाज माध्यमांवर अजित दादांच्या निधनाची बातमी धडकली, तेव्हा महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी अश्रू ढाळले. मात्र, तेच लोक पुढच्या क्षणी सांत्वन बाजूला सारून 'आता उपमुख्यमंत्री कोण होणार?' या चर्चेत रंगून गेले. माणसाचा मृत्यू इतका स्वस्त झाला आहे का? 'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' हे ऐकून होतो, पण आता 'सत्तेपुढे शोक आ...

एका 'लोकमाणसाचा' निवृत्ती प्रवास व वाढदिवस

इमेज
एका 'लोकमाणसाचा' निवृत्ती प्रवास व अभिष्टचिंतन सोहळा *माणसाने माणसासाठी माणसासारखे वागावे* हा विचार प्रत्यक्ष जगणारे व्यक्तिमत्व म्हणजे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लाडके दिलीप राजाराम पाटील मगर, ज्यांना सारा परिसर *'मगर बापू'* या नावाने ओळखतो. आज, ३१ जानेवारी रोजी बापूंचा वाढदिवस आणि याच दिवशी त्यांच्या प्रदीर्घ सेवा काळाचा निरोप समारंभही आहे.  एक स्वच्छ प्रतिमा, रोखठोक स्वभाव आणि जनसामान्यांच्या हृदयात असलेले अढळ स्थान सोबत घेऊन बापू आज सेवानिवृत्त होत आहेत. ३१ जानेवारी १९६८ रोजी जन्मलेल्या बापूंच्या बँकिंग सेवेचा गौरवशाली प्रवास करमाड शाखेतून सुरू झाला.  त्यानंतर त्यांनी भवन, राहिमाबाद, मार्केट यार्ड सिल्लोड, अजिंठा आणि पुन्हा भवन अशा विविध शाखांमध्ये आपली सेवा दिली. कॅशियर, क्लार्क आणि शाखाधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी केवळ आकड्यांची जुळवाजुळव केली नाही, तर माणसांची मने जोडली.  बापूंच्या सेवा काळातील मोठा हिस्सा 'भवन' शाखेत व्यतीत झाला. या काळात भवनसह पिंपळगाव पेठ, तांडाबाजार, गव्हाली, तलवाडा, बोरगाव कासारी, कायगाव, निल्लोड, ...

जिवरग पाटील फ्युल स्टेशन उद्घाटनाचे औचित्य साधून

इमेज
काल जीवरग पाटील फ्युल स्टेशन चा, उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला, हे सर्व व्यापारविश्व अष्टपैलू व्यक्तिमत्व पांडुरंग जीवरग (अण्णा) यांनी स्वबळावर उभे केले हे विशेष, नेहमीच जमिनीशी नाळ असलेले व उद्योगकर्मी म्हणून लोकप्रिय असलेले त्यांचे व्यक्तित्व माझ्यासाठी कायमच आदर्श आहे, पुढे हीच रीघ कायम ठेवत श्री कुणाल भैया जीवरग यांनी सातत्याने यशाला गवसनी घालण्याचा जणू क्रमच आखला आहे, आपल्या या व्यवसायाच्या सुरुवातीचे औचित्य साधून  माझ्याकडून व माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, भगवान निळकंठेश्वराकडे प्रार्थना करतो की तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य अगणिक लाभो व आपली ही विजयाची घोडदौड अखंड तेवत राहो 💐💐💐♥️♥️♥️🙏🙏 

मेंदूत धुमासणारा महाराष्ट्र घेऊन

इमेज
✍️ थेट ऋषिकेश सुरेश आहेरचा लेखणीतून    मेंदूत धुमासणारा महाराष्ट्र घेऊन सद्य स्थितीमध्ये महाराष्ट्रात जातिवाद राजकीय तेढ जेवढ्या शिगेला जाऊन पोहोचली असेल कदाचितच अशी वेळ यापूर्वी कधी आली असेल. थोर संतांच सानिध्य लाभलेल्या या महाराष्ट्र भूमीला जणू शाप लागावा तशी जातीय गुन्हेगारी मुळे उतरती कळा लागली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, समाजामध्ये सर्व धर्मीयांनी  एकत्रित येऊन गुण्या गोविंदाने राहण्याची नितांत गरज आहे.  ज्याप्रमाणे इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यासाठी फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली त्याच प्रकारे आज काही राजकीय उन्मत्त व्यक्तिमत्व त्यांच्या राजकीय पोळीसाठी धार्मिक तेढ निर्माण करून मलिदा खात आहे. मुळात माणसाची प्रथम ओळख ही एक माणूस म्हणून आहे याचा सर्वांना विसर पडलाय, आईच्या पोटातून जन्म घेतल्यावर कुठल्याही व्यक्तीच्या कपाळावर जात लिहिलेली नसते हे सर्वांनी ध्यानी घ्याव.  आपल्या प्रथा परंपरा संस्कृती सोहळे तिथपर्यंत धार्मिक मान्यता ठीक आहे, मात्र या परिघाच्या पलीकडे जात नावाची जाचक गोष्टच नको. धार्मिक कलह जेव्हा महाराष्ट्रात निर्माण होतो तेव्हा विशेष वाई...

🎖️ भारतीय जवान चंदू चव्हाण ?🎖️

इमेज
✍️ थेट ऋषिकेश सुरेश आहेरचा लेखणीतून साभार  🎖️ भारतीय जवान चंदू चव्हाण ? 🎖️ चुकून भारतीय सीमा पार करून पाकिस्तानात गेल्यामुळे सैनिक चंदू चव्हाण यांना पाकिस्तानात अत्यंत हाल अपेष्टा सोसून परत आल्यानंतर भारतातही वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाव लागल. सैन्याबाबत असलेल्या भारतीय कलमानुसार चंदू चव्हाण यांना नोकरी वरून देखील माघार घ्यावी लागली. मात्र इथे प्रश्न पडतो? अनावधानाने पाकिस्तान मध्ये शिरल्यामुळे जवान चंदू चव्हाण यांना एवढा त्रास सहन करावा लागतो व दुसरीकडे सीमा हैदर सारख्या व्यक्तीला एवढ्या सन्मानाने भारतीय नागरिकत्व बहाल केल्या जाते, यावरून नक्कीच वाटतेय की प्रशासनाचे रक्त गोठलय का? आयुष्याची 11 वर्ष सैन्य दलात सेवा देऊन चंदू चव्हाण यांनी चूक केलीय का ? या औरस प्रश्नांना कुठेतरी उभारी मिळाली पाहिजे तर खऱ्या अर्थाने न्यायव्यवस्थेची स्वतंत्रता दिसून येईल. आज चंदू चव्हाण यांना पेन्शनसाठी न्यायासाठी कुटुंबासाठी मंत्रालयासमोर न्यायाची भीक मागवी लागते यापेक्षा वाईट दिवस ते काय. ज्या सैनिकाने 11 वर्षापर्यंत तन-मन अर्पण करून भारत मातेची सेवा केली त्याच्यावर असे दिवस यावेत...

व्यक्ती विशेष / ऋषिकेश अजिनाथ काळे

इमेज
✍️ थेट ऋषिकेश सुरेश आहेर च्या लेखणीतून साभार ---------------------------  सातत्यकारी/ ऋषिकेश अजिनाथ काळे साधारण 2 वर्षापूर्वी माझि या अवलीया सोबत ओळख झाली ती माझा आते भाऊ भाऊसाहेब क्षिरसागर याच्यामुळे. ऋषिकेश काळे असे या व्यक्तिमत्त्वाचे नाव. ऋषिकेश सुरुवातीपासूनच खूप सोज्वळ आणि तीव्र इच्छा घेऊन जगणारा, मला आजही आठवत जेव्हा सुरुवातीला आमचं कॉल वरती बोलणं झालं होतं तेव्हा असं वाटलं होतं जणू खूप दिवसांपासून आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. खऱ्या अर्थाने ब्लॉगिंग काय असते youtube म्हणजे काय या तंत्रज्ञानिक गोष्टी मला ऋषिकेश मुळेच कळल्या. लिखाण कामाचा मला सुरुवातीपासूनच छंद आहे. वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण विषयांवर लिखाण करायला मला खूप आवडत, या दरम्यानच लिखाण कामाचा उपयोग आपण ब्लॉग आर्टिकल लिहिण्यासाठी सुद्धा करू शकतो असे मला ऋषिकेश च्या माध्यमातून कळले. सुरुवातीच्या क का कि गिरवण्या पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत बऱ्याच गोष्टी ऋषीने मला शिकवल्या. त्याच्याकडून प्रेरित होऊन मी माझ्या दैनंदिन गोष्टींविषयी लिखाण काम करायला सुरुवात केली. होस्टिंग डोमेन या भांडवली मित्रांसोबत माझा दुर ...

व्यक्ती विशेष

✍️ थेट *ऋषिकेश सुरेश आहेर* च्या लेखणीतून साभार  *------------------------------------------------* *व्यक्ती विशेष/ ऋषिकेश काळे* साधारण 2 वर्षापूर्वी माझि या अवलिया सोबत ओळख झाली ती माझा आते भाऊ भाऊसाहेब शिरसागर याच्यामुळे. ऋषिकेश काळे असे या व्यक्तिमत्त्वाचे नाव. ऋषिकेश सुरुवातीपासूनच खूप सोज्वळ आणि तीव्र इच्छा घेऊन जगणारा, मला आजही आठवत जेव्हा सुरुवातीला आमचं कॉल वरती बोलणं झालं होतं तेव्हा असं वाटलं होतं जणू खूप दिवसांपासून आम्ही एकमेकांचे मित्र आहोत.  खऱ्या अर्थाने ब्लॉगिंग काय असते youtube म्हणजे काय या तंत्रज्ञानिक गोष्टी मला ऋषिकेश मुळेच कळल्या. लिखाण कामाचा मला सुरुवातीपासूनच छंद आहे. वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण विषयांवर लिखाण करायला मला खूप आवडत, या दरम्यानच लिखाण कामाचा उपयोग आपण ब्लॉग आर्टिकल लिहिण्यासाठी सुद्धा करू शकतो असे मला ऋषिकेश च्या माध्यमातून कळले.  सुरुवातीच्या क का कि गिरवण्या पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत बऱ्याच गोष्टी ऋषीने मला शिकवल्या. त्याच्याकडून प्रेरित होऊन मी माझ्या दैनंदिन गोष्टींविषयी लिखाण काम करायला सुरुवात केली. होस्टिंग डोमेन या भांडवली मि...