माझे जिवन : नववा दिवस
आज सकाळी लवकर उठून योगासन केली. व शेतातून घरी जायला निघालो .. तसेही मी माझा जास्तीत जास्त वेळ शेतामध्येच निसर्गाच्या सानिध्यात घालवतो . जेवढे हिरव्यागार झाडांच्या अवतीभोवती माझे मन रमते तेवढा रस मला सिमेंट काँक्रीटच्या जंगलात अजिबात नाही . आयुष्यात कितीही यशाची शिखर पादांकृत केली तरीही निसर्ग सानिध्यात राहण्याची पक्की गाठ मनाशी बांधलीय मी खूप दिवसांपासून सिल्लोड येथील सेतू चालक व ॲडव्होकेट युवराज तायडे यांचं मला बोलावन होत मात्र काही कारण मीमांसेमुळे भेट होऊ शकली नाही आणि आज अनावधानाने तालुक्याच्या गावाला माझं महत्त्वाचं काम निघालं माझ्या कामातून वेळ काढून मी त्यांची भेट घेण्याच ठरवलं . त्यांनी त्यांची वेळ देऊन मला बोलावन केलं व त्यांच्या काही मित्र परिवाराला बोलावून सर्वांना माझी ओळख करून दिली. व सर्वसमावेक्ष मला भारताची राज्यघटना म्हणजेच संविधान भेट म्हणून दिले . हा अनुभव माझ्यासाठी खूप अस्मरणीय होता . राज्यघटनेचे बऱ्यापैकी वाचन मी या अगोदरही केले आहे . संपूर्ण राज्यघटना लक्षात ठेवणे एवढं सोपही नव्हे त्यासाठी काही खास स्वतःचा वेळ द्यावा ला...