व्यक्ती विशेष
✍️ थेट *ऋषिकेश सुरेश आहेर* च्या लेखणीतून साभार *------------------------------------------------* *व्यक्ती विशेष/ ऋषिकेश काळे* साधारण 2 वर्षापूर्वी माझि या अवलिया सोबत ओळख झाली ती माझा आते भाऊ भाऊसाहेब शिरसागर याच्यामुळे. ऋषिकेश काळे असे या व्यक्तिमत्त्वाचे नाव. ऋषिकेश सुरुवातीपासूनच खूप सोज्वळ आणि तीव्र इच्छा घेऊन जगणारा, मला आजही आठवत जेव्हा सुरुवातीला आमचं कॉल वरती बोलणं झालं होतं तेव्हा असं वाटलं होतं जणू खूप दिवसांपासून आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. खऱ्या अर्थाने ब्लॉगिंग काय असते youtube म्हणजे काय या तंत्रज्ञानिक गोष्टी मला ऋषिकेश मुळेच कळल्या. लिखाण कामाचा मला सुरुवातीपासूनच छंद आहे. वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण विषयांवर लिखाण करायला मला खूप आवडत, या दरम्यानच लिखाण कामाचा उपयोग आपण ब्लॉग आर्टिकल लिहिण्यासाठी सुद्धा करू शकतो असे मला ऋषिकेश च्या माध्यमातून कळले. सुरुवातीच्या क का कि गिरवण्या पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत बऱ्याच गोष्टी ऋषीने मला शिकवल्या. त्याच्याकडून प्रेरित होऊन मी माझ्या दैनंदिन गोष्टींविषयी लिखाण काम करायला सुरुवात केली. होस्टिंग डोमेन या भांडवली मि...