माझे जिवन : सातवा दिवस

आज घाई गडबडीतच वाचनालयाकडे निघालो होतो , तितक्यात कानावर निवृत्ती मगर यांची हाक ऐकू आली..... आवाजाच्या दिशेने जाऊन त्यांची भेट घेतली ते व त्यांचे सर्व मित्र गावातील चहा कट्ट्यावर बसले होते त्यांनी मलाही चहासाठी आग्रह केला मात्र माझ्या सवयीप्रमाणे मी चहा मध्ये अतिशयोक्ती टाळतो .... त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना दोस्ताना या विषयावर ब्लॉग वाचायला आवडेल असं त्यांनी सांगितलं म्हणून आज खास मैत्रीवर लिहाव म्हणलं....

मैत्रीमध्ये सर्वात यक्षप्रश्न म्हणजे खरा मित्र कोण , हल्लीच्या काळात खरा मित्र शोधणे म्हणजे कोहिनूर शोधण्यासारखं आहे ..... कारण प्रत्येकाला तुमच्यासोबत मैत्री करून तुमच्याकडून फायदा हवा असतो ..... फायदा तिथे मैत्री हे आता समीकरणच झालेलं आहे . अजूनही काही खऱ्या मित्रत्वाची जाण असलेले व्यक्ती या जगात आहेत मात्र ते बोटावर मोजन्या इतके शिल्लक आहेत. 

प्रत्येक जण मैत्री करताना मला समोरच्या व्यक्तीकडून काय फायदा होईल किंवा मी या व्यक्तीकडून स्वतःचा काय फायदा करून घेऊ शकतो हा विचार अगोदर स्वमनावर रुजवतात . व त्यानुसार मैत्री वाढवतात विनाकारण स्तुती करतात खोटी काळजी घेतात . 

असे मित्र वेळीच ओळखणे खूप गरजेचे आहे खालील काही बाबींवरून तुम्ही असे मित्र ओळखू शकता

1) खरा मित्र हा आरशासारखा असतो अगदी ज्या प्रकारे तुम्ही तुमचं प्रतिबिंब आरशामध्ये बघता त्या प्रकारे तुम्हाला निसंकोचपणे तुमच्या खऱ्या मित्रा मध्ये तुमची  स्वप्रतिमा दिसायला हवी 

2) जो नेहमी तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देईल धैर्य देईल

3) जो आपल्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या सोबत उभा राहील व आपल्याला आशेचा किरण दाखवून जगण्याची उमेद देईल

4) आपल्या चुका योग्य वेळी दाखवून काय बदल करायला हवेत याचं मार्गदर्शन करेल

5) आपल्या अपयशातही तो यश शोधेल 

6) आपली समृद्धी व विजय बघून सर्वप्रथम आनंद त्याला व्हायला हवा

असा मित्र मिळायला हवा 

मात्र मजेची गोष्ट ही आहे की असा मित्र शोधून सुद्धा सापडणार नाही , शक्यच नाही हे . या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कोणताही व्यक्ती निस्वार्थपणे कुणाची मदत करू शकत नाही . जो तो आपला स्वार्थ घेऊन जगतो .... कुणाला अनावधानाने जर निस्वार्थ मित्र मिळाला तर त्या सारखा नशीबवान कुणीच नाही . मात्र दुर्दैव असे मित्र आता दुर्मिळ होत आहेत . म्हणून प्रत्येकाला एकच सांगेल की तुम्हाला जर तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला समजून घेणारा किंवा तुमच्यावर प्रेम करणारा मित्र मिळाला नाही तर काही वावगं नाही तुम्ही तसे इतरांचे मित्र बना कदाचित तुमच्यासारखेच कुणाची तरी इच्छा पूर्ण होईल व तुम्हालाही समाधान लाभेल .

तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत सुखी रहा समाधानी रहा नमस्कारम.....!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका 'लोकमाणसाचा' निवृत्ती प्रवास व वाढदिवस

प्रस्थापितांच्या शोकाला जेव्हा सत्तेचे डोहाळे लागतात

मेंदूत धुमासणारा महाराष्ट्र घेऊन