माझे जिवन : नववा दिवस

आज सकाळी लवकर उठून योगासन केली. व शेतातून घरी जायला निघालो .. तसेही मी माझा जास्तीत जास्त वेळ शेतामध्येच निसर्गाच्या सानिध्यात घालवतो . जेवढे हिरव्यागार झाडांच्या अवतीभोवती माझे मन रमते तेवढा रस मला सिमेंट काँक्रीटच्या जंगलात अजिबात नाही . आयुष्यात कितीही यशाची शिखर पादांकृत केली तरीही निसर्ग सानिध्यात राहण्याची पक्की गाठ मनाशी बांधलीय मी     

  खूप दिवसांपासून सिल्लोड येथील सेतू चालक व ॲडव्होकेट युवराज तायडे यांचं मला बोलावन होत मात्र काही कारण मीमांसेमुळे भेट होऊ शकली नाही आणि आज अनावधानाने तालुक्याच्या गावाला माझं महत्त्वाचं काम निघालं माझ्या कामातून वेळ काढून मी त्यांची भेट घेण्याच ठरवलं . 

त्यांनी त्यांची वेळ देऊन मला बोलावन केलं व त्यांच्या काही मित्र परिवाराला बोलावून सर्वांना माझी ओळख करून दिली. व सर्वसमावेक्ष मला भारताची राज्यघटना म्हणजेच संविधान भेट म्हणून दिले . हा अनुभव माझ्यासाठी खूप अस्मरणीय होता .

राज्यघटनेचे बऱ्यापैकी वाचन मी या अगोदरही केले आहे . संपूर्ण राज्यघटना लक्षात ठेवणे एवढं सोपही नव्हे त्यासाठी काही खास स्वतःचा वेळ द्यावा लागतो. तेव्हा ते शक्य होईल . बऱ्याच दिवसापासून माझी सुद्धा राज्यघटना पुन्हा वाचण्याची इच्छा होती आणि आज राज्यघटनाच मला भेट म्हणून मिळाली ही माझ्यासाठी एक विशेष पर्वणी.
एक भारतीय म्हणून सामान्य व्यक्तीचे सर्वाधिकार राज्यघटनेत स्पष्ट केलेले आहेत. तुम्हाला तुमचे अधिकार , व्यक्ती स्वतंत्र, धर्म स्वतंत्र्य, भारतीय विविधता तसेच राज्यघटनेच्या विविध छटा जाणून घ्यायचा असल्यास एकदा तरी कर्तव्यनिष्ठ म्हणून राज्यघटना नक्की हाताळावी ही सर्वांना एक प्रेमळ विनंती असेल

ज्याप्रकारे कुणी विशिष्ट ग्रंथ विशिष्ट धर्माचे तत्त्व धारण करू पाहतो , अगदी त्याच प्रकारे सर्व भारतीय तत्त्वशीलतेने कसे नांदू शकतात , स्व विकास कसे साधू शकतात , न्याय अन्याय कसे पेलू शकतात या सर्वांचा आराखडा म्हणजेच राज्यघटना .... म्हणून सर्व तत्वे जेव्हां एक निष्ठेने रुजू लागतात तिथे संविधानाचा जन्म होतो . 

तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत सुखी राहा समाधानी रहा नमस्कारम ......!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका 'लोकमाणसाचा' निवृत्ती प्रवास व वाढदिवस

प्रस्थापितांच्या शोकाला जेव्हा सत्तेचे डोहाळे लागतात

मेंदूत धुमासणारा महाराष्ट्र घेऊन