माझे जीवन : तीसरा दिवस
आज सकाळी लवकर उठून योगासन केली , या अगोदरही मी नियमितपणे योगासन करत होतो मात्र दहा दिवस माझी परीक्षा असल्यामुळे माझा यामध्ये समतोल राहिला नाही . म्हटलं पुन्हा सुरुवात करावी व आज सकाळीच तयारीनिशी लवकर उठून रामदेव बाबांच्या लाईव्ह कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली व खंडित झालेला योगासनांचा प्रवास पुन्हा सुरू केला.... सूर्यनमस्कार शिकण्याची माझी खूप इच्छा आहे मात्र सध्या तरी शरीरावर अनावश्यक मेद साठल्यामुळे माझ्यासाठी ते शक्य नाही ... मात्र नियमित सरावाने मी लवकरच सूर्यनमस्कार पूर्णत्वासन नेईल . स्वाध्याय परिवाराचे प्रणेते श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांनी त्यांच्या तत्त्वज्ञान या मासिकात अविश्वसनीय असे सूर्यनमस्काराचे फायदे सांगितले आहेत . तेव्हापासून सूर्यनमस्कार या प्राचीन व्यायाम प्रकाराने मला जणू भुरळ घातली आहे . कपालभाती , अनुलोम-विलोम, वज्रासन, भस्त्रिका हे सर्व प्राणायाम मला माझे लहाने मामा सुनील वणार्से यांनी शिकविले आहेत . दररोज सकाळी लवकर उठून योगासन करण्याचा नित्य नियम त्यांचा अजूनही चुकलेला नाही . त्यांच्या पिळदार शरीरष्टी मुळे ते त्यांच्या मूळ वयापेक्षा 7-8 वर्षांनी लहान वाटतात असो... मी आज गावामध्ये सहज फेरफटका मारायला गेलो होतो तेव्हा तिथे सौरभ आणि विठ्ठल हे माझे दोन मित्र मला भेटले त्या दोघांची चर्चा ऐकून काही वेळासाठी संबित पात्रा आणि कन्हैया कुमार यांची आठवण झाली . त्या दोघांच्याही मतानुसार वाद - विवाद हा वैचारिक असावा वैयक्तिक नाही हे मला जाणवलं आणि मानवल सुद्धा . माणसाच्या अहंकारामुळे माणसाला स्वतःच्या चुका कधी दिसतच नाही जेव्हा केव्हा अहंकार गळून पडेल तेव्हाच आपण आपल्या चुका स्वीकारू शकतो . आणि तसंही चूक स्वीकारायला खूप धैर्य लागत , या जगातील खूप कमी लोक असं धैर्य बाळगतात. माणूस हा इतरांच्या बाबतीत एक वकील असतो तर स्वतःच्या बाबतीत एक उत्तम न्यायाधीश बनू पाहतो . स्वतःच्या फाजील आत्मविश्वासामुळे तो पूर्णत अंध झालेला असतो. म्हणून शास्त्रकार सांगतात की संतुलित आयुष्य महत्त्वाच . व्यक्तीकडे या जगातील सर्व सुख असतील मात्र संतोष नसेल तर त्या निर्जीव आयुष्याला काय अर्थ आयुष्याला अर्थही हा संतोषप्राप्ती मुळेच प्राप्त होतो. काही वाचकांना संतोष हा शब्द कळणार नाही म्हणून मुद्दामहून सांगू इच्छितो की संतोष म्हणजे सुख शांती प्रेम आनंद होय. या जगामध्ये दोन पैसे कमविण्याच तंत्र सहज प्राप्त होईल मात्र सुख शांती प्रेम आनंद लाभणे एवढं सोपं नाही . कारण हे कुठे विकत मिळत नाही स्वतः कोणत्याही परिस्थितीत तडजोड करून समाधानी राहणे हाच याचा प्राप्तीचा मार्ग आहे. संत तुकोबांनी सुद्धा सांगितले आहे की ठेविले "अनंते तैसेची रहावे चित्त असू द्यावे समाधाणी ". आयुष्य हे दोन प्रकारच असत एक समाधानी आणि दुसरं असमाधानी समाधाणी आयुष्याची व्याख्या आपण आपल्याकडे काय असावे कसे असावे यावरूनस्वतः ठरवतो तर असमाधणी आयुष्याची व्याख्या कुणी तिसरा व्यक्ती आपल्याकडे काय असावे व काय असू नये यावरून ठरवतो. यामुळेच आपल्याला काय हवं काय नको हे स्पष्ट असायला हवं . तरच आपले मार्गक्रमण हे समाधानाकडे सुरू होईल. तर चला मित्रांनो भेटूया उद्याच्या एपिसोड मध्ये ....तोपर्यंत सुखी रहा समाधानी रहा नमस्कारम...!
छान लिहिले आहे ऋषी
उत्तर द्याहटवाखूप छान ऋषी
उत्तर द्याहटवा