आज सकाळीच मला माझा मित्र योगेश गिरी याचा फोन आला तो पुस्तकांसाठी . खूप दिवसानंतर कुणीतरी पुस्तकांसाठी फोन केला होता . दिवसेंदिवस सामाजिक माध्यमांचा वापर वाढत असल्यामुळे पुस्तक वाचकांची संख्या लक्षणीय रित्या घटत आहे . मात्र हे विसरून चालणार नाही की जगातील सर्वाधिक यशस्वी माणस ही पुस्तकाला प्रथम प्राधान्य देतात . स्वतः मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स ने अनेक मुलाखतीमध्ये त्यांच्या यशाच रहस्य हे पुस्तके सांगितला आहे. महिन्यातील काही कालावधी हा बिल गेट्स एकांतात घालवतात तो पुस्तक वाचण्यासाठीच . भारतातील प्रसिद्ध वक्ते नितीन बानगुडे हे सुद्धा त्यांच्या यशाचं श्रेय पुस्तकांनाच देतात व त्यांचे ब्रीदवाक्य महाराष्ट्रात चांगलं प्रचलित आहे की पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं म्हणून. वाचाल तर वाचाल हा सुविचार आपण बालवयापासून ऐकत आलोय . मात्र अमलात कधी कुणी आणलंच नाही . भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे 25 हजार पुस्तकांचा संग्रह होता , जेव्हा बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये होते तेव्हा ते पुस्तके खरेदीसाठी पैसे नसल्याकारणाने एका वाचनालयात नेहमी जायचे , व दिवसभर वाचनालयात पुस्तक वाचत असायचे . एकदा बाबासाहेब पुस्तक वाचत असतानी पावाचा तुकडा हळूच खात होते कारण पोटभर जेवणासाठी सुद्धा पैसे नसत त्यांना शरीराच्या भुकेपेक्षा वाचनाची भूक महत्त्वाची वाटत असावी बहुतेक, ही गोष्ट ग्रंथपालाच्या निदर्शनास आली व त्याने बाबासाहेबांना शिक्षा करण्याचे ठरविले कारण त्याकाळी वाचनालयामध्ये काही खाण्यास मनाई होती . बाबासाहेबांनी ग्रंथपालास विनंती केली की मला पाहिजे ती शिक्षा द्या मात्र माझ्यासाठी वाचनालयाची दारे बंद करू नका , हे ऐकून ग्रंथपाल सुद्धा भारावून गेला व म्हणाला की तुमच्यासाठी शिक्षा हीच असेल मी उद्यापासून तुमच्यासाठी जेवण घेऊन येईल हे ऐकून बाबासाहेबांचे डोळे भरून आले व ते म्हणाले अशी प्रेमळ शिक्षा कोण नाकारेल. यावरून आपल्याला दिसून येईल की बाबासाहेबांच पुस्तकांवर किती प्रेम होतं . बाबासाहेब नेहमी म्हणत की ग्रंथ हेच गुरु . बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये पुस्तकांसाठी एक अनन्यसाधारण महत्त्व होतं , एकाप्रकारे त्यांच्या सर्वस्वामध्ये पुस्तकांचच योगदान होतं हे नाकारून चालणार नाही . अगदी ज्या प्रकारे आपल्याला शरीर सुदृढ , निरोगी असण्यासाठी सकस अन्नाची गरज असते त्याच प्रकारे आपल्या मनाला सुद्धा सकस वाचनाची गरज असते, साहित्यकार सांगतात वाचन हे मनाचे अन्न आहे . आपल्या वाचनाच्या स्तरावरूनच आपल्या विचारांची रीघ दिसून येते. इथून पुढे या अभासी तंत्रज्ञानाच्या जगामध्ये स्वतःला सावरायचं असेल तर प्रत्येकाने वाचायलाच हवं ...... अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनासुद्धा वाचनाची अफाट आवड होती . त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा मला आठवतो जो शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात अभ्यासासाठी होता. लहान लिंकनने कुण्या ग्रहस्थानकडून वाचनासाठी एक पुस्तक आणले होते, विद्युत शेगडीच्या प्रकाशात ते पुस्तक वाचत असत त्या रात्री त्यांच्या घराच्या परिसरात धो - धो पाऊस पडला व लिंकन पुस्तक खिडकीपाशी ठेवून तसेच झोपी गेले सकाळी उठून बघतात तर काय संपूर्ण पुस्तक भिजल होतं . हे बघून लिंकन ला खूपच वाईट वाटलं आता त्या ग्रहस्थाला पुस्तक कसं परत करावं असं कोडं लिंकनला पडलं . लिंकन भीत - भीत ते पुस्तक घेऊन त्या सदग्रहस्थाकडे गेले ततक्षणी त्यांना रडू कोसळले त्या ग्रहस्थानच्या संपूर्ण प्रकार लक्षात आला लिंकन त्यांना म्हणाले या पुस्तकाची जी किंमत असेल ती किंमत मी तुमच्याकडे कामावर येऊन चुकवेल . लिंकनचा प्रमाणिकपणा बघून त्या सदग्रहस्थानी लिंकन ला माफ करून पाहिजे ते पुस्तक कधीही घेऊन जा अशी प्रेमळ ताकीद दिली . यावरून लक्षात येईल पृथ्वीवर जेवढि काही महान लोक होऊन गेलीत त्यांच्या यश व समृद्ध आयुष्याला पुस्तकांचाच हातभार होता. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत सुखी रहा समाधानी रहा नमस्कारम......!
छान ऋषी
उत्तर द्याहटवामस्त ऋषी भाऊ
उत्तर द्याहटवा