माझे जीवन : पहिला दिवस
नेहमीप्रमाणे आज सकाळी लवकर उठून तयार झालो ..... माझे लहानपणीचे काही मित्र आज दिवाळीनिमित्त गावाकडे आले आहेत मला त्यांना भेटायचय म्हणून लगेच आवरा आवर करून घराबाहेर पडण्याचा बेत केला.... मी सुद्धा काही वर्षांआगोदर शिक्षणासाठी गावापासून दूर शहरांमध्ये होतो मात्र जेव्हा मी माझे बीए ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले त्यानंतर ठरवलं की पुढील शिक्षण गावाकडेच घ्यायचं आणि आता माझं गावाकडेच अर्थशास्त्रामध्ये एम ए चालू आहे .... मला कुठेतरी जॉब मिळावा या दृष्टिकोनातून मी अजिबात शिक्षण घेतलं नाही ... माझा नेहमी शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ज्ञान संपादित करणे व दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचा वापर करणे असा राहिला आहे ......
शिक्षण घेऊन घोकमपट्टी करणारा पोपाट होण्यापेक्षा व्यक्तीने सुजाण नागरिक व्हावे हे माझं वैयक्तिक मत आहे ..... माझ्या सभोवताली मी काही अशा लोकांना बघितलं आहे की जे खूप शिक्षण घेऊन खूप मोठे झाले मोठ्या पदावर नोकरी करत आहेत मात्र नैतिकता नावाची गोष्ट त्यांच्यामध्ये किंचितही दिसून येत नाही म्हणून मला वाटते की सुजन व्यक्ती होणे महत्त्वाचे असो...
मी घराची सीमा उल्लंघनार तोवर गणेश घरी आला .... प्रत्येक सोमवारी गणेश न चुकता माझ्याकडे येतो व पुढे आम्ही दोघे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले महादेवाच्या देवळावरती दर्शनासाठी जातो ..... हा नित्य नियम आमचा नेहमीचा आहे ..... देवळात गेल्याने मला एक गोष्ट मात्र नेहमी जाणवते ती म्हणजे निरव शांतता व सकारात्मक ऊर्जा देवाला नमस्कार करताना मन अगदी प्रफुल्लित होऊन जाते ..... आमच्या गावातील देवळाचा खूप जुना इतिहास आहे देऊळ पूर्णपणे हेमांडपंथी आहे ...... व त्या शेजारीच एक भव्य असे महानुभव पंथाचे मंदिर आहे ..... तिथले सकाळचे वातावरण अगदी स्वर्गा सारखेच असते ..... मनमोहून टाकणारा तो चाफ्याचा सुगंध चोहीकडे पसरू लागतो व संपूर्ण वातावरण सुगंधमय होऊन जाते ती मजा तर काही औरच .... देवळातून घरी आल्यावर शहरातून आलेला माझा मित्र संदीप मला भेटायला आला होता खूप दिवसानंतर भेटल्यामुळे मनसोक्त गप्पा रंगल्या .... संदीप सुरुवातीपासूनच खूप खटपटी व्यक्ती आहे नेहमी नवनवीन प्रयोग करायला त्याला आवडतं .... शेअर बाजार मध्ये सुद्धा त्याचा चांगला अभ्यास आहे काही दिवसांपूर्वी त्याने मला दोन-तीन शेअर सूचित केले होते मात्र मी योग्य वेळी खरेदी न केल्यामुळे मला 500 रुपयांचे नुकसान झाले .... तेव्हापासून मी ठरवलंय की अगोदर आपण स्वतः शेअर बाजाराचं चांगलं ज्ञान घ्यायचं परिपूर्ण अभ्यास करायचा आणि त्यानंतर गुंतवणुकीला प्रारंभ करायचा ...... शेअर बाजारातील हळूहळू काही गोष्टी आता माझ्या लक्षात येत आहेत ...... सर्व मित्रांना भेटून झाल्यावर मी गावात जाऊन झेंडूची फुले आणली व आईकडे सुपूर्द करून तसाच शेतावर निघालो .... जेव्हापासून आम्ही शेतामध्ये एक छोटे खाणी घर बांधलं आहे तेव्हापासून मला गावामध्ये विशेष रस राहिला नाही ..... माझे मन नेहमी शेतातच रंगते ...... तर चला मंडळी आता भेटूया उद्याच्या एपिसोड मध्ये...!
ReplyForward |

Nice
उत्तर द्याहटवाDada Ek No. 👍
उत्तर द्याहटवाखूपच छान ऋषिकेश राव,मला तर एकमद भारी वाटले😊🥳
उत्तर द्याहटवाखूप छान अप्रतिम🧡
उत्तर द्याहटवा